दि. 19.03.2022
साने गुरुजी रुग्णालय किनवट येथे डिजिटल एक्स – रे मशीन, 25 जंबो ऑक्सीजन सिलेंडरचे लोकार्पण.
दि. 19.03.2022 सकाळी 11.00 वाजता साने गुरुजी रुग्णालय किनवट येथे छोटेखानी कार्यक्रमात डिजिटल एक्सरे मशीन आणि 25 जंबो ऑक्सीजन सिलेंडर चे उद्घाटन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.
एक्स – रे युनिटसाठी लागणारा संपुर्ण खर्च (20 लाख रूपये ) पुण्याच्या बलदोटा परिवारातर्फे देणगी देण्यात आली असुन या युनिटला त्यांच्या दिवंगत मातोश्रींचे “स्व. सदाबाई नथमलजी बलदोटा स्मृती एक्स – रे युनिट” असे नाव देण्यात आले आहे.
तसेच 25 मोठे ऑक्सीजन सिलेंडर (जम्बो) कलेक्टीव गुड फाऊंडेशन व संहिता इनेशेटीव्ह यांच्या संयुक्त प्रयत्नातुन व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थीक मदतीतून उपलब्ध झाले आहे.
आता साने गुरुजी रुग्णालयात 300/- रुपये इतक्या माफक दरात गरजू रुग्णांना एक्सरे करुन मिळणार आहे. किनवट व परिसरात (सध्या एक एक्सरे काढण्यासाठी 500/- रुपये आकारल्या जातात.)
साने गुरुजी रुग्णालयात 24 तास डॉक्टर उपलब्ध असतात, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे हे स्वतः सर्जन आहेत, सोबतच नांदेड, आदिलाबाद अशा शहरातुन डॉक्टर व्हिजिट करत असतात यामुळे डॉक्टर आणि एक्सरे मशीन एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना याचा खुप लाभ होणार आहे.
या कार्यक्रमास साने गुरुजी रुग्णालयाचे कर्मचारी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.